गेवराई दि १७ ( वार्ताहार ) तिन वर्षापासुन निराधार प्रश्नी एकाही तहसिलदार यांनी संजय गांधी , श्रावणबाळ तसेच इंदरा गांधी निराधार योजना याची बैठकच घेतली नाही तिस हजार जवळपास अर्ज तहसिल कार्यलयात धूळखात पडले आहेत . हा प्रश्न सोडवण्याऐवजी किचकट कसा होईल यावर तहसिलदार यांचा भर असल्याचे जानवत आहे सगळ्या मंजूरी अर्जावर सुक्ष्म तपाणीचे आदेश तहसिलदार यांनी तलाठी ग्रामसेवक यांना काढले आहेत .
तालुक्यात जवळपास ३५ हजार लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत तसेच तिन वर्षानंतर तहसिलदार खाडे यांनी याविषयी समिती सोबत बैठक बोलावली होती ही बैठक निव्वळ चर्चेच्या गू-हाळात संपली आणि नविन अर्ज सादर करण्यासाठी तलाठी यांच्याकडे लाभार्थी यांनी अर्ज सादर करायचा असा नियम काढला गेला तलाठ्यांनीच अर्जदार योग्य किंवा अयोग्य असल्याबाबदचा शेरा या संचिकेवर करायचा होता असे आदेशीत झाल्यानंतर तलाठी यांच्याकडून ७ हजार तहसिल कार्यलास सादर करण्यात आले आहेत या अर्जावर देखील टांगती तलवार असल्याचे बोलले जात असुन उलट जे लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात यांच्या प्रकणात सुक्ष्म तपासणी लावल्याने यातील देखील हजारो अर्ज नामंजूर होतील हा विषय सोडण्याऐवजी किचकट झालेला आहे.
समितीचे एकही सदस्य या विषयावर बोलण्यास तयार नाही पंदरा वर्षानंतर प्रथमच सुक्ष्म तपासणीचे आदेश दिल्यानं स्फोटक निर्णय झाला असे म्हणण्यास देखील वावगे ठरणार नाही परंतू हा विषय लवकर मार्गी लावावा अश्या भावना लाभार्थी यांच्या आहेत . तसेच पंदरा वर्षानंतर सुक्ष्म तपासणी लावण्याचे कारण काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे .
काय आहे सुक्ष्म तपासणी ?
संजय गांधी तसेच इंदरागांधी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या संचिका तसेच लाभार्थी खरा आहे की ? खोटा तसेच त्यांच्यानावावर जमिन आहे किंवा नाही त्याला आपत्य आहे किंवा नाही प्रत्यक्षात लाभार्थी यांची काय परिस्थिती आहे यांचा संपुर्ण अहवाल तलाठी आणि ग्रामसेवक यांनी सादर करायचा आहे याला सुक्ष्म तपासणी म्हणतात .
एकही निराधार यांच्यावर अन्याय होणार नाही - मा . आ अमरसिंह पंडित
संजय गांधी व इंदरा गांधी या योजनेत जे काही चाललं आहे याविषयी आपण जिल्हाधीकारी यांच्या सोबत बैठक घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडणार असुन एकही लाभार्थी तसेच पात्र अर्जदार यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही तसेच यांच्या विषयी समितीची देखील बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करूण योग्य निर्णय घेण्यात येईल . कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल . अशी प्रतिक्रीया मा . आ अमरसिंह पंडित यांनी दिली आहे .