Advertisement

पदवीधरच्या निकालासाठी किती प्रतिक्षा?

प्रजापत्र | Wednesday, 28/10/2026
बातमी शेअर करा

 बीड: मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणीही कोटा पूर्ण करू न शकल्याने आता दुसऱ्या पसंतीची मते मोजणे सुरू आहे. त्यातही पहिले ४ उमेदवार वगळले तर इतर उमेदवारांना मिळालेली मते नगण्य असल्याने तब्बल ३६ उमेदवार बाद केल्यानंतरही कोटा पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निकालासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

   पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे चौथ्या क्रमांकावर असलेले उबाठा चे उमेदवार घुगे यांना बाद केल्यानंतर त्यांची हस्तांतरित होणारी मते कदाचित काही निर्णायक परिस्थिती निर्माण करू शकतात. त्यांच्या हस्तांतरित मतांमधूनही कोणालाही ८८५५८ चा कोटा पूर्ण करता आला नाही तर कदाचित रविराज साबळे यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतील. अपेक्षित कोटा पूर्ण करण्यासाठी प्रतापसिंह पाटील यांना सुमारे १५ हजार तर सतीश चव्हाण यांना २८ हजार मते आवश्यक आहेत. त्यामुळे रविराज साबळे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच निकाल लागेल आणि प्रतापसिंह पाटील व सतीश चव्हाण यांच्या भवितव्याचा फैसला निश्चित होईल असे अपेक्षित आहे. त्यामुळे आता किमान ४ वाजेपर्यंत तरी निकाल हाती येण्याची शक्यता कमी आहे.

Advertisement

Advertisement