परळी-पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्याप्रकरणातील बहुचर्चित नाव असलेल्या अरुण राठोड याच्या घरी चोरी झाल्याचे समोर आले आहे.कुटुंब घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. 
       बाहेरगावी गेलेले अरुण राठोड याचे कुटुंब धारावती तांडा परळी येथे सोमवारी (दि.१५) घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे समजले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं असून कुटुंबियांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. दरम्यान या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 
 
दहा दिवसांवर होते लग्न  
अरुण राठोड याच्या बहिणीचे २५ फेब्रुवारीला लग्न होते.या लग्नानिमित्त घरात मोठ्या खरेदी करण्यात आली होती.सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची माहिती असून परळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
                                    
                                
                                
                              
