Advertisement

संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोप पुन्हा लांबणीवर 

प्रजापत्र | Friday, 19/12/2025
बातमी शेअर करा

 बीड: संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder)हत्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात बचाव पक्षाला पुरावे देण्याची पूर्तता झाली नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आजची दोषारोप निश्चिती पुढे ढकलली आहे,पुढची तारीख आज दुपारनंतर मिळणार आहे 
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. आज (दि.१९) त्यात दोषारोप निश्चिती होणे अपेक्षित होते. मात्र आज पुन्हा बचाव पक्षाने दोषारोप निश्चितीपूर्वी पुरावे देण्याच्या तरतुदीची पूर्तता झाली नसल्याचे सांगितले. हल्ल्याचे व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नाहीत, हे कायदेशीर नसल्याचे सांगितले. बीएनएसएस च्या कलम २३० ची पूर्तता झाल्याशिवाय दोषारोप निश्चितीची घाई अभियोगपक्ष का करत आहे,असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. यावर विचार करून न्यायालयाने पुढील तारीख दुपारनंतर सांगणार असल्याचे म्हटले आहे

Advertisement

Advertisement