नेकनूर दि.१५ (वार्ताहार): येळंबघाट शिवारातील गंगा सुख रिनेव्हल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या सोलार प्लांन्ट येथून केबल अज्ञात चोरट्यांनी बुधवार (दि.१०)रोजी रात्री चोरून नेल्याची घटना घडली असून एकूण १,३०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
बीड तालुक्यातील येळंबघाट शिवारातील सर्व्हे नंबर ७८,७९ येथील गंगा सुख रिनेव्हल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सोलार प्लांन्ट आहे.येथून अज्ञात चोरट्यांनी आर.आर लाल रंगाचे १४,०० मीटर केबल अंदाजे किंमत ६५,००० रुपये व आर.आर काळ्या रंगाचे १४,०० मीटर केबल अंदाजे किंमत ६५,००० रुपये असा एकूण १,३०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार (दि.१०) रोजी रात्री ०१:०० ते सकाळी ०६:०० च्या सुमारास घडली असून विशाल पुरुषोत्तम जाखेटीया (वय ४६) मॅनेजर सोलार प्लांन्ट यांच्या फिर्यादीवरून रविवार (दि.१४) रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

