बीड दि.१४(प्रतिनिधी):शहरातील (Beed)बस स्थानकासमोरील बंजारा हॉटेल समोरून जात असताना अनोळखी दोन इसमांनी एका २३ वर्षीय तरुणाच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६२,००० हजारांचा ऐवज लंपास (Crime)केल्याची घटना शुक्रवार (दि.१२) रोजी घडली असून अज्ञात दोन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड (Beed)शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून वैभव गोरख हुंबे (वय २३) रा.पिंपळनेर ता.जि.बीड या तरुण शहरातील बस स्थानकासमोरील बंजारा हॉटेल समोरून जात असताना त्याच्या खिशातील ३२,००० रुपये रोख रक्कम व ३०,००० रुपये किमतीचा विवो २९ कंपनीचा मोबाईल असा असा एकूण ६२,००० हजारांचा ऐवज बळजबरीने लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.१२) रोजी रात्री ११:३० च्या सुमारास घडली असून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात वैभव हुंबे यांच्या फिर्यादीवरून शनिवार (दि.१३) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास (Beed police)बीड शहर पोलीस करत आहेत.

