Advertisement

गंगाखेड-परळी रोडवर रिक्षाचा अपघात 

प्रजापत्र | Saturday, 13/12/2025
बातमी शेअर करा

  परळी दि.१३ (प्रतिनिधी):  गंगाखेड–परळी मार्गावरील निळा पाटी परिसरात ऑटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात परळी शहरातील बबनराव राऊत (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेमुळे परळी शहरात शोककळा पसरली आहे.
 
     बबनराव राऊत हे शुक्रवारी सकाळी नातेवाईकांसह गंगाखेड येथील एका लग्न समारंभासाठी गेले होते. दुपारी लग्न आटोपून परत येण्यासाठी गंगाखेड बसस्थानकासमोर त्यांनी परळीकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षात जागा पकडली. दुपारी अडीचच्या सुमारास गंगाखेडजवळच निळा पाटीयेथे हा ऑटोरिक्षा अचानक उलटला. ऑटोरिक्षामध्ये चालकासह एकूण दहा प्रवासी होते.चालकाच्या शेजारी बसलेले बबनराव राऊत यांना रिक्षा उलटल्याने हँडलचा जोरदार मार लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात होताच रिक्षा चालक तातडीने घटनास्थळावरून पसार झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे. उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. 

Advertisement

Advertisement