गेवराई दि.१३(प्रतिनिधी):तालुक्यातील तपोनिमगाव शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शुक्रवार (दि.१२) रोजी कारवाई करत ६,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तलवाडा (Police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed) जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा सपाटा सुरु असून गेवराई तालुक्यातील तपोनिमगाव शिवारातील दत्तबाग येथे गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना परमेश्वर भानुदास शिंदे रा.तपोनिमगाव ता.गेवराई जि.बीड याच्यावर शुक्रवार (दि.१२) रोजी कारवाई केली. यात महिंद्रा कंपनीचा ७५७ कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र.एमएच २३ बी ७७९२ अंदाजे किंमत ५,००,००० रुपये व एक निळ्या रंगाची विना नंबरची लोखंडी ट्रॉली व त्यामध्ये एक ब्रास वाळू अंदाजे किंमत १,०५,००० रुपये असा एकूण ६,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास(Police) तलवाडा पोलीस करत आहेत

बातमी शेअर करा
