Advertisement

कुंभमेळ्यासाठी ३०० झाडांची कत्तल

प्रजापत्र | Thursday, 11/12/2025
बातमी शेअर करा

नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याची योजना असल्याने तब्बल १ हजार ८०० झाडं तोडावी लागणार आहेत. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात आजपासून वृक्षतोडीस सुरुवात झाली असून नवीन एसटीपी (सीवरेज ट्रीटमेंट प्लांट) उभारणीसाठी ३०० झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने ४४७ झाडांना रीतसर परवानगी घेतल्याचा दावा केला आहे.

   मागील अनेक दिवसांपासून पर्यावरणप्रेमी या वृक्षतोडीविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र आज प्रत्यक्षात झाडांची कत्तल सुरू झाल्याने त्यांच्यात संतापाची लाट आहे. साधुग्रामच्या झाडांबाबत निर्णय प्रलंबित असतानाच एसटीपी प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तपोवन परिसरातील वृक्षतोड, साधुग्राम प्रकल्प, शेतकऱ्यांचा विरोध आणि पर्यावरणप्रेमींचे आंदोलन या सर्व घडामोडींमुळे नाशिकमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील काही दिवसांत या विवादावर कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement