बीड दि.९(प्रतिनिधी) : नगरपरिषदेत गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी अभिलेख विभागातील आशिष मस्के यांना १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवार (दि.९) रोजी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच बीड नगरपरिषदेत गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी अभिलेख विभागातील आशिष मस्के यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवार (दि.९) रोजी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीडचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेने बीड नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा

