Advertisement

परळीत महावितरण कार्यालयासमोर भाजपचे 'टाळा ठोको व हल्लाबोल' आंदोलन

प्रजापत्र | Friday, 05/02/2021
बातमी शेअर करा

परळी दि.५ (वार्ताहर)-लॉकडाऊनच्या काळात ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांना वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले.मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाईट बिल भरा, नाहीतर वीज तोडू असा इशारा दिला.महाविकास आघाडीत गोंधमुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून ग्राहकांना वीज बिल माफी हवी प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (दि.५) परळीत भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर  'टाळा ठोको व हल्लाबोल' आंदोलन करण्यात आले.यावेळी महावितरणच्या कार्यालयात टाळे ठोकण्यात आले होते.    
                   महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले असल्याचे सांगत परळी मुंडे भगिनींच्या मार्गदर्शनखाली शुक्रवारी (दि.५) भाजपाने  महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले.या  आंदोलनात सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया, जीवराज ढाकणे,डाॅ.शालिनी कराड,दत्तापा इटके, श्रीहरी मुंडे, भीमराव मुंडे, वैजनाथ जगतकरसह भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

Advertisement

Advertisement