Advertisement

 बसप्रवासात महिलेचे दागिने लंपास

प्रजापत्र | Sunday, 07/12/2025
बातमी शेअर करा

 नेकनूर दि.७(वार्ताहार):मांजरसुंबा ते नांदुरफाटा या बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.५) रोजी घडली असून एकूण ७०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून मीनाक्षी जयप्रकाश बांगर (वय ४२) रा.भक्ती कन्स्ट्रक्शन बीड या मांजरसुंबा ते नांदुरफाटा बसमध्ये प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधील १० ग्रॅमचे गंठण, ५ ग्रॅमचे कानातील फुले,३ ग्रॅमचे वेळ, १० ग्रॅमचे लॉकेट,८ ग्रॅमची अंगठी असा एकूण  ७०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.५) रोजी दुपारी ०२:३० च्या सुमारास घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात शनिवार (दि.६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement