आष्टी दि.१(प्रतिनिधी):तालुक्यातील टाकळसिंग येथे तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हिंगे हे करत आहेत.
जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील मजूर रोहिदास चव्हाण (वय ३५) हे सध्या मजुरी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कुटुंबासह आलेले असून, याच ठिकाणी राहात आहेत. त्यांचा मुलगा श्रावण रोहिदास चव्हाण (वय ८) व मुलगी श्रावणी रोहिदास चव्हाण (वय १०) हे दोघे बहीण-भाऊ (दि.२९) नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता खेळत खेळत शेतकरी शिवाजी दौंडे यांच्या शेतात गेले.यावेळी शेत तलावात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हिंगे हे करत आहेत.
बातमी शेअर करा

