बीड दि.८ (प्रतिनिधी): विजेचा शॉक लागून एका ३७ वर्षीय कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
राजू गौतम पाचंग्रे (वय ३७) रा. भीमनगर, परळी या कामगाराला शनिवार (दि.८) रोजी सकाळी साडेकरा वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागल्याने यामध्ये त्याचे निधन झाले. मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या कामगाराच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा यासह इतर परिवार आहे.
बातमी शेअर करा

