Advertisement

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माणिक गायकवाड यांचे निधन

प्रजापत्र | Thursday, 04/02/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष माणिक लक्ष्मण गायकवाड (४२) यांचे अल्पशा आजाराने लातूर  येथे उपचार सुरु असताना निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नुकताच त्यांचा पक्ष कार्याची दखल घेत गौरव करण्यात आला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे धारुर  व परळी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 
खामगाव ता. परळी येथील रहिवासी असलेले आ.प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. पालकमंत्री धनंजय मुंडे व आ. सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  सामाजिक न्याय विभागाचे उत्कृष्ट कार्य त्यांनी केले. याबद्दल डिसेंबर २०२० मध्ये पक्षाच्या वतीने शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. मुंबई येथे १९ जानेवारी २०२१ ला पक्षाच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. मुंबईहून परतल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी लातूरला  दाखल होते. काल दि.३ बुधवार रोजी रात्री आठच्या सुमारास त्यांची  प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एक सच्चा कार्यकर्ता गमावला असून परळी व धारुर  तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement