Advertisement

बंधार्‍यामध्ये आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

प्रजापत्र | Tuesday, 07/10/2025
बातमी शेअर करा

 गेवराई दि.७(प्रतिनिधी): तालुक्यातील टाकळगाव शिवारातील एका बंधार्‍यात 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. या तरुणाची आज दुपारपर्यंत ओलख पटलेली नव्हती.

    गेवराई तालुक्यातील टाकळगाव शिवारात असलेल्या एका बंधार्‍यात ३० ते ३५ वयोगटाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मयताच्या अंगावर काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, निळ्या रंगाचे शर्ट आहे. हा मृतदेह वाहून आला असावा, असा प्राथमिक अंदाज असून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या नद्यांना महापूर आलेला आहे. त्यातून कुठला तरी युवक वाहून आला की काय, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. मयताच्या ओळखीसाठी गेवराई पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना या मयताबाबत काही माहिती असेल त्याने पो.कॉ. जायभाये, पो.नि. बांगर त्याचबरोबर गेवराई ठाणे 02442-2621000 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement