Advertisement

 जायकवाडी धरणातून विसर्ग वाढविला

प्रजापत्र | Sunday, 28/09/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.२८(प्रतिनिधी): जायकवाडी प्रकल्प,नाथसागर जलाशय, पैठण येथून आज रविवार (दि. २८) रोजी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत विसर्ग वाढविण्यात आला आहे. या दरम्यान धरणाचे द्वार क्र. १० ते २७ असे एकूण १८ नियमित दरवाजे ०.५ फूट उचलून ६.० फूट पर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात अतिरिक्त ९४३२ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

   यामुळे सध्या १८ नियमित व ०९ आपत्कालीन गेटमधून मिळून १४१४८० + ९४३२ = १५०९१२ क्युसेक इतका एकूण विसर्ग सुरू आहे. पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने माहिती दिली आहे की, आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील जनतेने सावधगिरी बाळगावी, अनावश्यक नदीकाठाशी संपर्क टाळावा तसेच पशुधन व शेतीसंबंधी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून गोदावरी नदीचा प्रवाह जात असल्याने येथेही नागरिकांनी सतर्क राहावे. विशेषतः नांदूर हवेली, खामगाव, हिवरा, दिंडी, तडवळे, आणि नदीकाठच्या वस्तीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना प्रशासनाने पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे पूर नियंत्रण कक्षाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement