चकलांबा दि.२५(वार्ताहार): येथील पोलीस (Police)ठाणे हद्दीतील उमापूरमधून एक अल्पवयीन मुलगी १९ वर्षाच्या तरुणासोबत मध्यरात्री १ वाजता घर सोडून पळून गेली होती.याबाबत पहाटे ५ वाजता मुलीच्या वडिलांनी चकलांबा पोलीस ठाण्यात येत तक्रार दाखल केली.त्यानुसार पहाटे ५.३० वाजता पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर साडेतीन तासाच्या शोधमोहिमेनंतर हे जोडपे पोलिसांना सापडले.सपोनि संदीप पाटील व (Crime)त्यांच्या सहकाऱ्यांनी भल्या पहाटेपासून शेतात आणि वस्तीत झाडाझडती घेतल्यामुळे त्या मुलीचा आणि मुलाचा शोध लागला होता.पोलिसांच्या या कारवाईबाबत पालकांनी आभार मानले आहेत.
उमापूरमधील एका १७ वर्षीय मुलीने गावातील १९ वर्षीय मुलासोबत मध्यरात्री १ वाजता घरातून पळ काढला.दोघांनी ही घर सोडल्यानंतर काही वेळातच मुलगी आणि तो मुलगा घरात नसल्याने दोन्ही कुटुंबाना लक्षात आले.त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पहाटे ५ वाजता चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि संदीप पाटील यांनी मुलीचे मोबाईलचे लोकेशन काढले.यानंतर लोकेशनवरून सदर जोडपे हद्दीतच काही अंतरापर्यंत पळून गेल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी पाठलाग सुरु केल्यानंतर मात्र या जोडप्याला कुणकुण लागताच मोबाईल बंद झाला.त्यामुळे पोलिसांना शेतात आणि वस्तीत साडेतीन तास तपास मोहीम राबवावी लागली.दरम्यान पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले असून दोघांनाही पोलीस ठाण्यात नोंद घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील,श्री.प्रधान,हनुमान इंगोले,किरण मिसाळ,संदीप गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली.

बातमी शेअर करा