शिरूर कासार दि.१४(प्रतिनिधी):शहरातील(Shirur) पोलीस ठाण्या जवळील घर अज्ञात चोरटयांनी फोडल्याची घटना (दि.१३) रविवार रोजी रात्री १:३० ते सकाळी सहाच्या दरम्यान घडली असून चोरटयांनी १,७७,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केला केल्या प्रकरणी शिरूर(shirur police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर (Crime)असलेल्या डी.सी.सी बँक परिसरातील रहिवाशी विजय चांगदेव सुरे (वय ४८) रा.शिरूर कासार यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील कोठीत ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना (दि.१३) रविवार रोजी रात्री घडली असून यामध्ये ८ ग्रॅम सोन्याचे कानातले झुंबर अंदाजे किंमत ५६००० रुपये ,साडेनऊ ग्रॅमची गळ्यातील पॉट अंदाजे किंमत ४६००० रुपये व (Beed police) एका गल्ल्यात वर्षभरापासून साचवलेले पैसे अंदाजे ७५००० रुपये असा एकूण १,७७,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.