परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी): बीडहून परळी (Parli Vaijnath) आणि परळीहून सोनपेठ असा एसटीने प्रवास करणाऱ्या सोनपेठ येथील रहिवासी असलेल्या वयोवृद्ध जोडप्याचे सोन्याचे तब्बल ९ लाखाचे दागिने चोरीला गेल्याची घटना (दि.१०) रोजी घडली आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी सुर्यकांत परळकर (वय ६० वर्षे) रा.महाजन गल्ली सोनपेठ व त्यांचे पती हे छ. संभाजीनगर (Crime)येथे आपल्या मुलीकडे गेले होते. (दि.१०) एप्रिल रोजी सकाळी संभाजीनगर -बीड-परळी-सोनपेठ या प्रवासा दरम्यान त्यांच्या बॅग मधून मोहन माळ किमंत ३ लाख रुपये, सहा तोळ्याचे गंठण किमंत ३ लाख रुपये, एक नेकलेस किंमत २ लाख रुपये, सोन्याची बोरमाळ १ लाख रुपये असे एकूण ९ लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर (Beed police)पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे करीत आहेत.

बातमी शेअर करा