शिरूर कासार दि.२४(प्रतिनिधी):तालुक्यातील खालापूरी(shirur kasar) शिवारातील शेतातील विहिरीमध्ये बसवलेली विद्युत मोटार अज्ञात चोरटयांनी (दि.२१) शुक्रवार रोजी लंपास केल्याची घटना घडली असून चोरट्याविरुद्ध शिरूर (shirur police)कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)जिल्ह्यात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.चोरांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्याकडे वळवला आहे.शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथील श्रीराम शेषेराव पवार (वय ६३) रा.तागडगाव यांच्या खालापुरी (Crime)शिवारातील गट नं.५७६ मधील पडक नावाच्या शेतातील विहिरीमध्ये बसवलेली विद्युत मोटार अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.२१) शुक्रवार रोजी घडली असून यात सोलार पंम्प ३ एचपीची सोलरची मोटर अंदाजे किंमत ६५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी श्रीराम पवार यांच्या फिर्यादीवरून (shirur kasar)शिरूर कासार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासा (Beed police)पोलीस करत आहेत .