मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल अर्थमंत्री (ajit Pawar) अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने मागील वर्षी सुरु केलेली आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) ही योजना बंद केल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना (Eknath Shinde) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता.
या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. दरम्यान, (Anandacha Shidha)आता ही योजना बंद करण्यात आल्यामुळे रेशनकार्ड धारकांना मोठा फटका बसणार आहे. अर्थमंत्री(ajit Pawar) अजित पवार यांनी काल मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा या योजनेबाबत कोणतीही तरतूद केली नसल्याचे दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकवर्षी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा अशा सणांना आनंदाचा शिधा देण्यात येत होता.