पाटोदा दि.७ (प्रतिनिधी): तालुक्यातील (patoda(कुसळंब येथे गुरुवार (दि.६) रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरे फोडली. या तिन्ही घरातून जवळपास १५ तोळे सोने व रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात (crime news)चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्रीतून येथील अशोक पवार, गौतम पवार, उध्दव पवार यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोकड असा लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याचे आज (दि.७) रोजी उघडकीस आले.गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतून चोरट्यांची दहशद वाढली असुन पोलीसांनी(Beed poice) तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
बातमी शेअर करा