Advertisement

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई 

प्रजापत्र | Friday, 07/03/2025
बातमी शेअर करा

 गेवराई दि.७(प्रतिनिधी): (Georai)तालुक्यातील नागझरी येथील चौकात विनापरवाना ट्रॅक्टरच्या साहाय्याने (Sand smuggling)अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी (दि.६) गुरुवार रोजी कारवाई करत ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून (Beed)जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील नागझरी येथील चौकात विनापरवाना  (Georai) ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक करताना विलास मोहन शिंदे (रा.नागझरी ता. गेवराई) याच्यावर गेवराई पोलिसांनी (दि.६) गुरुवार रोजी कारवाई केली .यात जॉन डियर ५०५० डी कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर व  हिरव्या रंगाची विना नंबरची जुनी ट्राली एकूण अंदाजे किंमत ७,००,००० व ट्रालीमधील वाळूची अंदाजे किंमत ६००० असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement