बीड दि. ५ (प्रतिनिधी ) : माजलगाव धरण (Majalgaon Dam)परिसरात धार्मिक, ऐतिहासिक , शैक्षणिक व निसर्ग पर्यटनाच्या माजलगावचे आमदार (Prakash Solanke) प्रकाश सोळंके युचविलेल्या प्रकल्पाला पाटबंधारे विभागाने खो घातला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ५७ एकर जागा ही धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येत असल्याचा अहवाल लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप यांनी (Beed)बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
माजलगावचे (Prakash Solanke) आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव धरण (Majalgaon Dam)परिसरात पर्यटन विकासाच्या संदर्भाने एक सविस्तर प्रकल्प प्रस्तावित केला होता. यात मासेमारी संदर्भातील महाविद्यालय, मासेमारी संशोधन केंद्र , जलपर्यटन, विश्रामगृह, उद्यान आदी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचा प्रकल्प आराखडा देखील प्रशासनास सादर करण्यात आला. या प्रकल्पासाठी पाटबंधारे विभागाकडील सुमारे ५७ एकर जागा आवश्यक आहे. या प्रस्तावानुसार बीडच्या(Beed) जिल्हाधिकाऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला सदर जागा जिल्हाधिकारी बीड यांचेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र धरण परिसरातील चिंचगव्हाण क्षेत्रात असलेली सदर जागा धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येते, तसेच भविष्यात माजलगाव धरणाची उंची वाढविण्याचे देखील प्रस्तावित असल्याने सदर जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता (Prakash Solanke) आ. प्रकाश सोळंके यांच्या प्रस्तावित महत्वाकांक्षी प्रकल्पावर पाणी फेरले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता आ. प्रकाश सोळंके यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.