Advertisement

मुंबईचे डबेवाले सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

प्रजापत्र | Monday, 03/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई : मुंबईचे डबेवाले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची साथ सोडणार आहेत. (Mumbai)ते लवकरच उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरेंनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी डबेवाल्यांना अनेक आश्वासने दिली होती. मुंबई महापालिकेत त्यांच्या शिवसेनेची पाच वर्षे सत्ता होती. काही काळ स्वतः ठाकरे मुख्यमंत्री होते. फक्त डबेवाला भवनाव्यतिरिक्त त्यांनी दुसरे कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही.

यावरून डबेवाला कामगारांमध्ये ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या शिवसेनेबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. (Mumbai)त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत, अशी माहिती तळेकर यांनी दिली. ते म्हणाले, की डबेवाल्यांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत.ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सोडवू शकतात, अशी खात्री आहे. तसेच ९० टक्के डबेवाले हे पुणे जिल्ह्यातील आहेत व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे तेथील विकासकामे ते करू शकतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहोत.

Advertisement

Advertisement