लातूरच्या चाकूरमध्ये सोमवार (३)रोजी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास (Latur)दुचाकीला वाचविण्याच्या नादात एसटीचा भीषण अपघात झाला असून यात तीन प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अधिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर एका(Latur bus accident) मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि एसटी विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाली, यानंतरही घासत पुढे गेली. हा थरारक अपघात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लातुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात अनेकांचे हात तुटले आहेत असून अपघात स्थळी जखमी प्रवाशांची बोटे तुटून पडली होती. (police)पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी पोहचून जखमींना हाॅस्पिटलमध्ये पोहचवले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.