किल्लेधारुर दि.१(प्रतिनिधी): (Kille dharur)दहावीच्या शालांत परीक्षा सध्या सुरू आहेत. आज (दि.१) शनिवार रोजी इंग्रजीचा पेपर असल्याने शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दोन मुलांनी साडेअकरा वाजता (dharur)इंग्रजीचा पेपर खिडकीतून घेऊन पलायन केले. पेपर फुटल्याची बातमी सर्वत्र चविने चर्चिली जात (Ssc exam)असतानाच पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत फोडलेला पेपर जमा करून घेतला.
दहावी बोर्ड परीक्षा मागील काही वर्षात धारूर शहरात शांततेत आणि व्यवस्थित पार पडत होत्या. (beed)परंतु यंदा सध्या सुरू असलेल्या एसएससी बोर्ड दहावीच्या (दि.१) मार्च शनिवार रोजी होत असलेल्या इंग्रजी पेपर काही पोरांनी फोडल्याची घटना धारूर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर घडली. सदरील बाबीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अवघ्या अर्ध्या तासात शिताफिने त्या पेपर फोडणाऱ्या पोरांना ताब्यात dharur police)घेऊन पोलीसी खाक्या दाखवत पेपर उपलब्ध करून घेतला. (Ssc bord exam)परंतु बोर्ड परीक्षा त्यातच इंग्रजीचा पेपर अर्धा ते पाऊण तासात फुठला असल्याने पालकांमधून आता संभ्रम निर्माण झाला आहे. धारूर तालुका शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी पेपर फोडणाऱ्या आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि सदरील पेपर फुटलेल्या प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
धारूर केंद्रावर इ़ग्रजी पेपर फुटी प्रकरणी दोन जन ताब्यात- पोलीस निरीक्षक वाघमोडे
धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे इंग्रजी विषयाचा दहावीचा पेपर पुढल्या प्रकरणी दोघा तरुणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. या पाठीमागे आणखीन साखळी आहे का? याचा सखोल तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी सांगितले.