परळी वैजनाथ दि. २० (प्रतिनिधी)-(Parli Vaijnath) मोठमोठ्या कामांचा अनुभव असल्याच्या टिमक्या वाजवत काम करणाऱ्या (Yash Constructio)यश कन्स्ट्रक्शनच्या सोनपेठ अंबाजोगाई रस्त्याच्या कामावर एका मजुराचा चक्क रोडरोलरखाली येऊन दुर्दैवी आणि करुण मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हालहाल व्यक्त होत असून यश कन्स्ट्रक्शनच्या बेजबाब्दारपणाबद्दल संताप देखील व्यक्त होत आहे. कंपनीच्या विरोधात गाढेंपिंपळ्गाव येथील ग्रामस्थांनी रास्तारोको करून आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. या प्रकरणात कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे, मात्र उशिरापर्यंत असा कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता .
परळी (Parli Vaijnath)तालुक्यातील नाथरा फाट्याजवळ (Sonpeth ambejogai) सोनपेठ-आंबेजोगाई रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर काम यश कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. यश कन्स्ट्रक्शन कंपनी या परिसरात मोठ्याप्रमाणावर रस्ताकामे करीत असून आपली कंपनी फार मोठी आहे आणि आपण कामगारांची काळजी घेतो असा आव अनेकदा या कंपनीकडून आणला जातो. मात्र गुरुवारी घडलेल्या (Accident)घटनेमुळे या कंपनीचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
गाढे पिंपळगाव येथील युवक युवराज दत्तात्रय राऊत (वय-२७) हा गेल्या दीड वर्षांपासून (Yash Constructio)यश कंट्रक्शन कंपनीमध्ये काम करत आहे. या कामावर गुरुवारी (दि.२०) सकाळी १० च्या सुमारास रस्ता रुंदीकरणाच्या कामावर रोडरोलरचे काम सुरू होते.त्यावेळी अचानक युवराज राऊत या (Beed)रोडरोलरखाली आल्याने जागीच मृत्यु झाला. रोडरोलरच्या वजनामुळे युवराजचे शरीर अक्षरशःचपटे झाले होते.. युवराजच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त कुटुंबीयांनी काहीकाळ रास्ता रोको करत ड्रायव्हरवर कारवाई करुन कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ (Parli police)पोलीसांशी संपर्क करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
कंपनीचा ढिसाळ कारभार
ज्यावेळी रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली जातात , त्यावेळी कामगारांच्या किमान सुरक्षेकडे लक्ष्य देणे आवश्यक असते. तसेच कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास काही उपाययोजना करणे अपेक्षित असते , मात्र याठिकाणी या कोणत्याच गोष्टी पाहिल्या गेल्या नाहीत . रोडरोलरखाली एखादा कामगार येत आहे हे देखील त्यावेळी कसे लक्षात आले नाही हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहे. मात्र यावर अजूनही कंपनीकडून कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झालेले नाही. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही