आष्टी दि.१९ (प्रतिनिधी)-अवैध वाळूची तस्करी आणि उत्खननला जिल्हा पोलीस दल आणि महसूल विभागाने बऱ्यापैकी रोख लावल्यानंतर ही जिल्ह्याच्या काही ठिकाणी वाळूची वाहतूक (Transport of sand) चोरट्या मार्गाने सुरु आहे.आष्टी अंतर्गत वाळुंजमध्ये दोन टॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch Beed) दोन्ही वाहनांवर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.यात १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नवनाथ देविदास शिंदे (रा.वाळुंज) आणि विलास रामदास जोगदंड (रा.टाकळसिंग) असे पकडलेल्या दोन आरोपींचे नावे आहेत.वाळूमाफियांची दादागिरी पोलीस अधिक्षकांनी मोडीत काढल्यानंतर काही माफिया चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करीत आहेत.याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांनी कारवाई करत दोन टेम्पो ताब्यात घेतले.यावेळी टेम्पोमध्ये तीन ब्रास वाळू होती.या कारवाईत १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (In this action, 10 lakh 30 thousand worth of goods were seized) असून आष्टी पोलीस ठाण्यात दोघांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर,पोलीस हवालदार अशोक दुबाले,दिपक खांडेकर,सोमनाथ गायकवाड,बाळू सानप,अर्जुन यादव,सिद्धार्थ मांजरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा