Advertisement

'छावा' चित्रपट मराठीतून प्रदर्शित करा

प्रजापत्र | Wednesday, 19/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई-'छावा' चित्रपट (दि.१४)फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

 

'छावा' यी चित्रपटावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता (Uday Samant) उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज "छावा" चित्रपटाचे (Chhaava)दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. " छावा " चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही (Matathi)मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. असे  (Uday Samant)उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement