राहाता : गुजरात राज्यातील सुरत येथील (Saibhakt) साईभक्त शिर्डी (Shridi)येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनातून येत असतांना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात त्यांचे चारचाकी वाहन अज्ञात तरुणांनी अडवून बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन(crime) चोरटे पसार झाले होते.या घटनेप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी (Saibhakt)साईभक्तांना लुटण्या बरोबरच संगमनेर, घोटी व वैजापूर येथील रस्तालुटीच्या घटनेची कबुली दिली आहे.
विजय गणपत जाधव, (वय २९ रा.गोंधवणी, श्रीरामपूर), सिध्दार्थ भाऊसाहेब कदम, (वय २९ ), राहुल संजय शिंगाडे, (वय ३५ ), सागर दिनकर भालेराव, (वय ३०), समीर रामदास माळी, (वय २६ ) दोन विधीसंघर्षित बालक (सर्व रा.पोहेगाव, ता.कोपरगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ९ लाख रुपये किंमतीची पांढरे रंगाची इर्टिगा कार (क्रमांक एमएच-४१ -व्ही-२८१७ ), ४५ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल, दोन एअर गण, तीन लोखंडी कत्ती, पिवळया धातुच्या अंगठया व चैन असा एकुण ९ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.