धाराशिव : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा सरकारसोबत संघर्षाच्या पवित्र्यात असल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आपण आणखी व्यापक करणार असल्याची घोषणा (Manoj Jarange) जरांगे यांनी केली आहे. तसंच आपल्याविरोधात सरकारी पातळीवर षडयंत्र रचलं जात असून सरकारमधील दोन मंत्र्यांकडून (Maratha reservation) मराठा आरक्षणासाठी प्रतिआंदोलन केलं जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. तसंच याबाबतची माहिती सरकारमधीलच एका मंत्र्याने मला दिली, असंही त्यांनी सांगितलं आहे.
"मराठा आरक्षणाची चळवळ कमकुवत व्हावी, यासाठी सरकारमधील दोन मंत्री आंदोलन करणार आहेत. १३-१४ दिवस उपोषण करून सरकारकडून हे उपोषण सोडवलं जाईल आणि समाजाची दिशाभूल केली जाईल," असा दावा (Manoj Jarange) मनोज जरांगे यांनी धाराशिव इथं बोलताना केला आहे.दरम्यान, मनोज जरांगे यांनी केलेल्या दाव्यानुसार खरंच राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी काळात उपोषण करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.