बीड दि.१६(प्रतिनिधी)- शहरात(Beed) सद्यस्थितीला पोलीस अधिक्षक (Navneet kanwat) नवनीत कावत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक(subhas sanap) सुभाष सानप यांच्या सहकार्याने सध्या वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर पोलीसांनी चांगलीच (traffic police)कार्यवाही सुरु केली असून गेल्या आठवड्यातच २०० रिक्षाचालकांवर दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही केली होती त्यामुळे रिक्षाचालकांना देखील वाहतुकीच्या नियम मोडल्यामुळे तसेच कागदपत्रे नसल्याने कार्यवाहीचा चांगलाच दणका बसला होता. (दि.१५) रोजी विशाल संजय कुलकर्णी (रा.आदित्य नगर, बीड) यांची मोटारसायकल २४ तासाच्या आत सापडून देण्याची उल्लेखनिय कामगिरी जिल्हा वाहतुक शाखेने केली आहे त्यामुळे नागरिकांत पोलीसांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, (Beed)बीड शहरातील विशाल संजय कुलकर्णी (रा.आदित्य नगरी, बीड) यांची मोटारसायकल (दि.१५) शनिवार रोजी अज्ञात चोराने चोरुन नेली होती ती मोटारसायकल जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, वसुदेव मिसाळ, बजरंग कुटुंबरे, पोलीस हवालदार राजाभाऊ तांदळे, महिला पोलीस शिपाई अनिता पवार, पोलीस हवालदार नितीन शिंदे, विष्णु काकडे, पोलीस नाईक अजिनाथ मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख व चालक पोलीस हवालदार हरके यांच्या टीमने शहरातील साठे चौकात वाहतुक नियमांचे उल्लंघन करत असतांना सदरील संशयित मोटारसायकल चालकास पोलीसांनी पकडले व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत असतांना डिवायएसवर मुळ मालक यांचा मोबाईल नंबर मिळाला त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की काल (दि.१५) शनिवार रोजी माझे वाहन चोरीला गेले याबाबत मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे. त्यानंतर सदरील वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकारी आणि (Beed police )कर्मचार्यांनी चोरीची पडताळणी करत पुष्टी केली व आरोपीस पोलीस स्टेशन (Beed shivajinagar)शिवाजीनगर यांच्या ताब्यात दिले. यामुळे वाहन चोरी करणार्या आरोपींचे चांगलेच धाबे दणाणले असून नागरिकांतून पोलीसांविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.