Advertisement

वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

प्रजापत्र | Sunday, 16/02/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१६.(प्रतिनिधी)- शहरातील (Beed)मित्र नगर चौकाच्या बाजूला असलेल्या शाहू बँके जवळ विनापरवाना (tempo)टेम्पोच्या सहाय्याने (Sand smuggling)अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी (दि.१५) शनिवार रोजी  दोनच्या सुमारास कारवाई करत चार लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

 

 मादक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून (Beed)जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.शहरातील मित्र नगर चौकाच्या बाजूला असलेल्या शाहू बँके जवळ विनापरवाना टाटा टेम्पोच्या सहाय्याने (Sand smuggling)अवैध वाळू वाहतूक करताना शेख रफिक शेख बशीर (वय २७) रा.जुना मोंढा मन्सुरशाह दर्गा जवळ बीड याच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी (दि.१५) शनिवार रोजी कारवाई केली. यात टाटा टेम्पो क्र.एम एच  १८ एम ६३८१ व वाळू भरण्यासाठी आलेली जेसिबी क्र. .एम एच  २३  बीएच ०९७९ यांच्यावर गुन्हा दाखल करून लाल रंगाचा टाटा टेम्पो  अंदाजे किंमत ४,००,०००  दोन ब्रास अंदाजे किंमत १४,००० रुपये असा एकूण ४,१४,००० रुपयांचा मुद्देमाल (Beed police)शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement