Advertisement

 शेतीचा वादावरून शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या !

प्रजापत्र | Sunday, 16/02/2025
बातमी शेअर करा

तलवाडा दि.१६ (प्रतिनिधी)- (Talwada)शेतीच्या वादातून शेतकऱ्याने (Farmer Suicide)बीष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राहेरी (Georai)(ता.गेवराई) येथे  (दि.१५) रोजी घडली. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी मानसिक त्रास देणाऱ्या संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेतली होती. शेवटी आज (दि.१६) रोजी सकाळी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 

 

गेवराई(Georai)तालुक्यातील तलवाडा पोलीस (Talwada police )ठाण्याअंतर्गत राहेरी येथील शेतकरी (Farmer Suicide)उध्दव अर्जन लाड (वय ४५) यांनी शनिवार (दि.१५) रोजी दुपारी ३ च्या सुमारास विष प्राशन केले होते. त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी बीड(Beed)येथील जिल्हा रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले. आज (दि.१६) रोजी सकाळी ९ च्या सुमारास उपचार सुरू असतांना उध्दव लाड यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे. दरम्यान मयत उध्दव लाड आणि त्यांचे भाऊ बाळासाहेब लाड यांनी राहेरी येथील गट क्र. १४० मधील खरेदी खत क्रमांक ४८५२/२०२४ दि.५/९/२०२४ च्या खरेदीखताची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे (दि.२५) जानेवारी २०२५ रोजी निवेदनाद्वारे केली होती. शेतीच्या(Farmer Suicide) प्रकरणात फेर ओढू नका म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांनी (दि.१२) फेब्रुवारीपर्यंत स्टे दिला होता. मात्र तो स्टे त्यांनी (दि.१४) तारखेला (Beed)आमच्या परस्पर उठविला. त्यानंतर तलाठ्यांनी फेर ओढला. तेंव्हापासून मयत भाऊ उध्दव लाड याने मनस्ताप करून घेतला. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे भाऊ बाळासाहेब लाड यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement