गेवराई दि.१५ (प्रतिनिधी)- (Georai)तालुक्यातील हिंगणगाव शिवारात पाथरवला बंधाऱ्याजवळ विनापरवाना ट्रॅक्टरच्या सहाय्याने (Sand smuggling)अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी (दि.१४) शुक्रवार रोजी कारवाई करत सहा लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून (Beed)जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तालुक्यातील हिंगणगाव शिवारात पाथरवला बंधाऱ्याजवळ विनापरवाना (Georai) ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक (Sand smuggling)करताना शुभम उर्फ लल्या सिताराम काटकर (वय २४),पार्थ सिताराम काटकर दोन्ही रा,पाथरवला ता.अंबड जि.(jalna)जालना यांच्यावर गेवराई पोलिसांनी (दि.१४) शुक्रवार रोजी कारवाई केली. यात विना नंबर महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर व काळसर रंगाची ट्रॉली एकूण ६,००,००० रु , विना नंबर ट्रॉलीमध्ये १ ब्रास वाळू किंमत ४,००० रु असा एकूण ६,०४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गेवराई (Georai police)पोलीस करत आहे .