Advertisement

  बैलगाडी उलटून १४ वर्षीय नातवाचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 15/02/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.१५ (प्रतिनिधी) - (Ashti)बैलगाडी बसून शेतातून घरी परतताना समोरुन रानडुकरे गेल्याने बैल बिथरल्याने बैलगाडी उलटून नातवाचा मृत्यु तर आजोबा जखमी झाल्याची घटना पाटण सांगवी ता.आष्टी येथे शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जगताप वस्तीजवळ घडली आहे.

आष्टी (Ashti)तालुक्यातील पाटण सांगवी येथील भाऊसाहेब बन्सी जगताप (beed)हे शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास शेतातून आपले दोन नातू अन् एक नात, गवत आणि भुईमूगच्या शेंगा घेऊन बैलगाडीतून येत होती. यावेळी अजानक रानडुकरे अडवे गेल्याने (Bail)बैल बिथरुन उधळले अन् यामुळे (Bailgadi)बैलगाडी उलटून यामध्ये अभिराज उर्फ (बाल्या) नानाभाऊ जगताप (वय १४ ) याचा जागीच मृत्यु झाला. आजोबा भाऊसाहेब जगताप हे जखमी झाले. तर इतर एक नातू अन् नात हे दोघे सुखरूप आहेत. मयत अभिराज याच्यावर रात्री उशिरा १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने पाटण सांगवी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement