Advertisement

अज्ञाताने पेटवले घर; ५५ हजारांचे नुकसान

प्रजापत्र | Friday, 14/02/2025
बातमी शेअर करा

शिरूरकासार दि.१४ (प्रतिनिधी)- (Shirur)तालुक्यातील पिंपळनेर येथील देवडे वस्तीवरील सत्यभामा राजेंद्र देवडे यांचे  (दि.१२) रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराला (Fire) आग लावली. यामध्ये त्यांचे ५५ हजारांचे नुकसान झाले असून शिरूर कासार पोलीस (Shirur kasar police )ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

           अधिक माहिती अशी की,(Pimpalner) पिंपळनेर येथील रहिवाशी असलेल्या सत्यभामा राजेंद्र देवडे (वय ३७) यांच्या राहत्या घरातील अज्ञाताने संसार उपयोगी सामान,कपडे,धान्य,जुना टीव्ही ,किंमत २०,००० व भरणीतील ३५,००० असा ऐकून ५५,००० हजारांचा ऐवज कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून जाळून (दि.१२) रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान नुकसान केले.सत्यभामा राजेंद्र देवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात (Shirur kasar police)शिरूरकासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement