बीड दि. १३ (प्रतिनिधी) : (beed)बीडमधील विलासी उदारवंताचा सोने घोटाळा समोर आल्यानंतर सोन्याच्या धंद्यातील अनेक काळे किस्से (Gold scam part 4 )आता चर्चिले जात आहेत. समोर आलेला विलासी चेहरा एक असला तरी पडद्यामागचे अनेक चेहरे समोर पांढरपेशेपणा दाखवत आडुन मात्र सोन्यात बोगसगिरी (Fraud)करतात आणि एखादे प्रकरण अंगलट येणार असे वाटताच थेट त्या ग्राहकासमोर 'लोळ'न घेतात याचे किस्से सध्या चर्चेत आहेत.
मागच्या काळात बॅंका, मल्टिस्टेट यांच्यातल्या पैशाच्या सुरक्षेची खात्री देता येत नाही असे चित्र निर्माण झाले, त्यामुळे खात्रीशीर गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली. सोन्याचा सगळाच व्यवहार तसा विश्वासाचा, पण या विश्वासालाच नख लावणारा 'विलासी' प्रकार बीडमध्ये समोर आला. त्यावर 'प्रजापत्र'ने प्रकाशही टाकला. मात्र समोर न येताही सोन्यात बोगसगिरी करणारांचे अनेक किस्से सध्या चर्चिले जात आहेत.
घरातील मंगल प्रसंग असेल, सन उत्सव असतील त्यासाठी 'शुभम् भवतू' म्हणत सोने खरेदी केली जाते. मात्र त्या सोन्यात सांगितल्यापेक्षा अधिक बट्टा असल्याचे नंतर उघडकीस येत आहे. या बट्टेबाजांची(Gold cheater )ख्याती सोन्याच्या मार्केटला इतकी आहे की त्यांच्याकडचे सोने इतर कोणी सहसा मोड म्हणून स्वीकारत नाहीत. एखाद्याने सोने दुसरीकडे कोठे तपासले आणि त्यात तांबे किती, सोने किती याचे पुरावेच दाखवायला सुरुवात केली तर मात्र मग तोच दुकानदार, 'ताई लोक खोटं बोलतात हो, जळतात आमच्यावर, आणा तुमचा दागिना, लगेच देतो त्याचे पैसे' असे म्हणत चक्क त्या ग्राहकाच्या पायावर 'लोळ'न (surrender) घ्यायला तयार असतात.
पुर्वीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा
भाग १
https://prajapatra.com/11913
भाग २
https://prajapatra.com/11919
भाग ३
https://prajapatra.com/11921
बाकी चोरीचे सोने घेणारी साखळी वेगळीच असते. बगळ्यासारखा पांढरा वेश करुन सोन्यात काळे धंदे करायचे आणि पुन्हा आपण किती पोहचलेलो आहोत हे दाखवायचे असा काहींचा धंदा.
सध्या तो व्यक्ती आहे का नाही माहित नाही, पण एक व्यक्ती तर म्हणे अगदी दागिना गाठता गाठता ग्राहकाच्या डोळ्यादेखत दोन्ही अंगठ्याच्या नखामध्ये काही मिलीग्राम सोने ढापायचा असे सांगतात.
हे सारेच आणि असे अनेक चेहरे कायम पिवळया सोन्यात काळे धंदे करुन पुन्हा बडेजाव मिरवीत आले आहेत, पण यामुळे सोन्याची खरेदी करायची तरी कशी असा प्रश्न आता सामान्यांना पडला आहे. सोने खरेदी करताना काय पहायचे याबाबत उद्याच्या अंकात. ( क्रमशः)