Advertisement

कस्टम च्या सोन्याची (Custom )(Gold scam)आली 'उबाळ', हरवले माजलगावकरांचे(Majalgaon)'समाधान'

प्रजापत्र | Wednesday, 12/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि. १० (प्रतिनिधी ) : बीडमध्ये(Beed) सोन्याच्या नावाने तांबे हवाली करून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आल्यानंतर आता जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सोन्याच्या नावाखाली लोकांना फसविण्यात आल्याचे समोर येत आहे.(Gold scam)बीड पाठोपाठ माजलगावमध्ये देखील काही धनाढ्यांना कस्टमच्या सोन्याची 'उबाळ' आली आणि त्यापायी त्यांनी एका भलत्याच व्यक्तीला लाखो रुपये दिले असल्याची माहिती आहे. आता माजलगावकरांचे 'समाधान ' हिरावून सदर वक्ती गायब झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिवळ्या सोन्यातले काळे धंदे मात्र उघड होऊ लागले आहेत .
बीड शहरात एका 'विलासी ' 'उदा'र'वंत' व्यक्तीने वित्तीय संस्थांसह अनेक व्यापारी व सामान्यांना कोट्यवधींचा गंडा (Cheating )घातल्याचे समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. या व्यक्तीने नेमके किती लोकांना आणि कोणत्या संस्थांना कसे गंडविले आणि बीडमधील धक्क्याचे हादरे 'बडोद्या ' पर्यंत कसे पोहचत आहेत हे अद्यापही पूर्णपणे समोर यायचे आहे.

बीडमधील सुवर्ण घोटाळा वाचण्यासाठी click करा
https://prajapatra.com/11913

 मात्र हा 'विलासी ' व्यक्ती माजलगावच्या वेशीवर असतानाच एका भलत्याच व्यक्तीने माजलगावकरांना कस्टमच्या सोन्याची 'उबाळ ' आणली. तुम्हाला कस्टमचे सोने मिळवून देतो म्हणून माजलगावमधील कोणाकडून दहा लाख, कोणाकडून पाच लाख जमा केले आणि आणि नंतर त्याने पोबारा(Abscond)केला असल्याची माहिती आहे. मागच्या काही दिवसांपासून ज्यांनी त्याला पैसे दिले ते त्याचा शोध घेत आहेत, मात्र त्या व्यक्तीचा काहीच तपास लागत नसल्याची माहिती आहे. कस्टमच्या सोन्याच्या हव्यासापोटी आता माजलगावकरांचे लाखमोलाचे 'समाधान ' हिरावले गेले आहे. इथेही पुन्हा बीडसारखेच , मुळात कस्टमच्या सोन्याचा हव्यास धरणेच  चुकीचे  , त्यामुळे या साऱ्या व्यवहाराची कोठेच लिखापढी नाही, सारे काही चालणार होते ते विश्वासावरच , त्या विश्वासालाच आता हरताळ फसला गेला आहे. आणि लाखो रुपये गमावून केवळ हात चोळत बसण्याची वेळ माजलगाव शहरातील अनेकांवर आली आहे. कस्टमच्या सोन्याच्या लालसेपोटी चेहऱ्यावर काजळी लागते का काय असाच प्रश्न आता त्या फसविले गेलेल्या 'बिचाऱ्यांना ' पडला आहे. (क्रमशः )
 

Advertisement

Advertisement