बीड दि.१३ (प्रतिनिधी)- (Beed)येथील एमआयडीसी, मोंढा भागातील (Tirumala oil)तिरुमला ऑईल मिल मधून जनरेटर चोरी करून घेवून जात असतांना नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडले होते. याप्रकरणात सदाशिव कुटे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर गित्ते, (रा.अयोध्य नगर,परळी) आणि अमोल देंगे (रा. वंजारवाडी, ता. गेवराई) या दोघांविरुध्द पेठ बीड पोलिस (Beed police)ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी त्यांच्याकडून जनरेटरसह गुन्ह्यात वापरलेला टेम्पो, क्रेन जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
पेठ बीड भागातील एमआयडीसी परिसरात असलेल्या (Tirumala oil) तिरुमाला ऑईल मिलजवळ (दि.१२) फेब्रुवारी रोजी टेम्पो क्रमांक एम.एच.१२, ई. क्यू. २८४१ हा उभा होता. त्याचवेळी क्रेन क्रमांक एम.एच.१८, ए.एन.३८५० च्या सहाय्याने दोन इसम ऑईलमिलमधील जनरेटर काढत असतांना दिसून आले. नागरिकांनी
त्यांना हटकले आणि दोघांनाही पकडून ठेवले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड ठाण्याचे पोलिस देशमुख, सोनवणे, नशीर शेख, कलिम इनामदार, धनवडे व इतरांनी त्याठिकाणी येवून दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सदाशिव ज्ञानोबा कुटे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर त्रिंबकराव गित्ते, (वय ३८), रा. अयोध्या नगर, परळी आणि अमोल उध्दव ढेंगे, वय ३१, रा. वंजारवाडी, ता. गेवराई या दोघांविरुध्द पेठ (Beed police)बीड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) + प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.