Advertisement

फसवणूक झालेले ७५१००० लाख दिले तक्रारदाराला मिळवून

प्रजापत्र | Tuesday, 11/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यातील प्रकाश मुंडे यांची शेअर मार्केटमर्ध्ये ७५१००० रूपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी बीड (beed police)सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीनेत पास करून तक्रारदारास रक्कम परत मिळवून दिली. पोलिस अधिक्षक कॉवत यांच्या हस्ते तक्रारदाराला रक्कम सुपूर्द करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, (दि.८) फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रारदार श्री प्रकाश पोपट मुंडे रा. हिवरडा ता. भुम जि. (Dharashiv)धाराशिव ह.मु. आदर्शनगर, (beed)बीड यांना फेसबुक वर प्राप्त झालेली शेअर मार्केट मधील ट्रेडींग ची लिंकhttps://WWW.troweprice-india./ com/corporate/US/Utility/contact-us.html  द्वारे व्हॉटसअप गृप मध्ये समाविष्ट झाले. त्यानंतर तक्रारदार यांना सदर व्हॉटसअपगृप मधील अडमीन मंजु देवी यांनी शेअर मार्केटींग बद्दल माहीती देवुन तक्रारदार यांना काही शेअर्स खरेदी करण्यास भाग पाडले त्यानंतर, खरेदी केलेले शेअर्स चा नफा हा कमी कालावधीत जास्त दाखविल्याने तक्रारदार यांनी व्हॉटसअप गृप मधील अडमीन मंजु देवी यांच्याकडुन वेळोवेळी शेअर्स खरेदी केले, शेअर्स चा नफा हा तक्रारदार यांना प्रोफाईल वर दिसत होता. यावरुन तक्रारदार यांनी एकुण 751000/- रुपयाचे शेअर्स खरेदी केलेले होते. खरेदी करण्यात आलेल्या शेअर्स चा नफा हा तक्रारदार यांना प्राप्त झालेल्या प्रोफाईलवर एकुण 1800000/- रुपये दिसुन आलेला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी सदरची रक्कम विड्रॉल करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली असता, त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली. त्यांनी सदर गृपमधील अडमीन मंजु देवी यांच्याशी वारंवार संपर्क करुन परतावा मिळण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली. परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली. त्यांनी व्हॉटसअप गृपमधील वरीष्ठ अव्देत खन्ना यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी सांगीतले की, आपणास 1800000/- रुपये मिळण्यासाठी आपणाला 10% टॅक्स भरावा लागेल यावरुन त्यांनी 180000/- रुपयाचा भरणा करण्यास सांगीतले. यावरुन त्यांची फसवणुक झाल्याची खात्री झाली. तक्रारदार यांनी दि. 29/04/2024 रोजी सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे घडलेल्या घटनेची लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारदार श्री प्रकाश पोपट मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन, (beed police)बीड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रीक पध्दतीने तपास करुन तक्रारदार यांची ऑनलाईने पध्दतीने फसवणुक करुन घेतलेले एकुण 751000/- रुपये ही तक्रारदार यांचे खातेमध्ये परत मिळवुन दिली आहे.
सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक नवीन कॉवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गात, पो.नि. श्री. घोडके, पो.उपनि कासले, पो.ह. बप्पासाहेब दराडे, विजय घोडके, अनिल डोंगरे, पंचम वडमारे, गणेश घोलप, रामदास गिरी, पो.ना. श्रीकांत बारगजे, दत्तात्रय मस्के, पो.अं./ प्रदिपकुमार वायभट, अजय जाधव, अमोल दरेकर, निलेश उगलमुगले व महीला पोलीस अंमलदार खरात, शिंदे, औसरमल, काशिद, गवते, चादर सर्व सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.
सर्व नागरीकांनी ऑनलाईन पध्दतीने आर्थिक व्यवहार करताना, आलेले फोन, SMS, ची खात्री करुनच व्यवहार करावा व तात्काळ 1930 वर संपर्क करावा असे सायबर पोलीस स्टेशन, बीड तर्फे आवाहान करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement