सोलापूर: (Pune-solapur)पुणे-सोलापूर महामार्गावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मिनीबसला कंटेनरने ठोकले आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ हा भीषण (Accident)अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरची थेट (minibus)मिनीबसला धडक. यावेळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला आणि कंटेनर राॅन्गसाइडवर जाऊन एका मिनी (Travels)ट्रॅव्हल बसला धडकला. या अपघातात दुचाकीस्वार, बसचालकासह तिघे ठार झाले आहेत. तर बसमधील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान कोळेगाव पाटीजवळ घडली. मिनी बस मधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ दर्शन घेऊन (Pandharpur)पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. भाविकांच्या मिनीबसचा भीषण अपघात झाल्याने (solapur)सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या कोळेगाव पाटी जवळ चौरस्ता असल्याने अपघाताची भीती वर्तवली जात आहे.