Advertisement

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या,अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार

प्रजापत्र | Sunday, 09/02/2025
बातमी शेअर करा

बीड-  (Beed) जिल्ह्यात नाफडेच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी दिवस-रात्र सोयाबीन केंद्राबाहेर ठाण मांडून आहेत. मात्र, अद्याप या सोयाबीनची विक्री झालेली नाही. (दि.६)फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत होती. मात्र, ती संपल्यानं पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. 
                              सरकारी सोयाबीन (soybean) खरेदीची मुदत संपली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती. मात्र, त्यापूर्वीच सरकारी खरेदी बंद केली आहे. याच मुद्यावरुन किसान सभा (Kisan Sabha) आक्रमक झली आहे. सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून  पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिला. तसेच मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार असल्याचेही नवले म्हणाले.

Advertisement

Advertisement