बीड दि.९(प्रतिनिधी): गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरातील एका अनोळखी व्यक्तीचा (beed police)मृतदेह आढळल्याची घटना आज (दि.९) रोजी दुपारी उघडकीस आली आहे. सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गेवराई (Georai) तालुक्यातील सिरसदेवी परिसरातील जवळच असलेल्या बेडकी या शिवारात गढी माजलगाव रोड या ठिकाणी हायवेपासून जवळच असलेल्या एका शेतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तेथील लोकांनी पाहिला त्या व्यक्तीचे अंदाजे वय ५५ ते ६० च्या आसपास दिसत आहे. या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना मिळताच सिरसदेवी बिट अंमलदार नारायण पिसाळ व नवनाथ डोंगरे घटनास्थळी आले असता पंचनामा केला तसेच या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन तलवाडा पोलिसांनी केले आहे.
बातमी शेअर करा