Advertisement

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई 

प्रजापत्र | Sunday, 09/02/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.९ (प्रतिनिधी)- (Georai)गेवराई तालुक्यातील अंतरवली येथील शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीजवळ विनापरवाना ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच (Talwada)तलवाडा पोलिसांनी (दि.८) शनिवार रोजी कारवाई केली. या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

अधिक माहिती अशी कि,(Beed)जिल्हाभरात वाळू माफियांवर कारवाईचा सपाटा पोलिसांनी सुरू केला असून  (Georai)गेवराई तालुक्यातील अंतरवली येथील शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीजवळ विनापरवाना टॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक करताना शुभम सुरेश पंडित (वय २५) रा. दैठन ता.गेवराई.जि.बीड  यांच्यावर (Talwada police)तलवाडा पोलिसांनी (दि.८) शनिवारी कारवाई केली.यात स्वराज कंपनीचा लाल कलरचा ट्रॅक्टर मॉडेल ७४४ एक्स टी  क्र.एम एच.२३.बीसी ५२६५ व त्यासोबत  लाल रंगाची विना नंबरची ट्राली  असा अंदाजे ५,०५,०००/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई तलवाडा पोलीस करत आहेत

Advertisement

Advertisement