कर्जत : नाफेडने राज्यातील (Soybean) सोयाबीन खरेदी केंद्र बंद केली आहेत यावर (Rohit Pawar )रोहित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. एवढे बहुमत मिळाल्यावर ही शेतकऱ्यांना मात्र नुकसान सहन करावे लागत आहे.
यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, दीड महिन्यापूर्वीच नाफेडने केंद्र सुरू केले आहेत असे सांगितले. मात्र सोयाबीन ठेवण्यासाठी बॅगा नाहीत असे फालतू कारण सांगून खरेदी केली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन (Soybean)उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार रुपये एवढ्या कमी दारामध्ये सोयाबीन विकावे लागत आहे. सोयाबीन उत्पादकांना यावर्षी देखील २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. असे रोहित पवार म्हणाले.