पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात (Lonawala) जाऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतल्यानं, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असं पोलीस (Police) उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, मात्र तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. दरम्यान, आज त्यांचा शोध लागला असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
बातमी शेअर करा