दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा आम्ही सर्वांनी अभ्यास केला. यामध्ये आम्हाला मततदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार (rahul gandhi) राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले. ते दिल्लीत आज (दि.७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
५ महिन्यांत वाढलेले मतदार कोण?- राहुल गांधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आढळून आली. महाराष्ट्रात ५ महिन्यांत इतके मतदार कसे वाढले? असा सवालदेखील त्यांनी केला. याचवेळी हिमाचल प्रदेशमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढेच मतदान झाले आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार (Supriya Sule) सुप्रिया सुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार (Sanjay Raut) संजय राऊत उपस्थित होते.